ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच ,एक ग्रामपंचायत सदस्य व खाजगी इसम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई

सातारा न्युज (सातारा)दि. 29जुलै :- ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच ,एक ग्रामपंचायत सदस्य व खाजगी इसम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी कारवाई केली.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार व्यवसाय चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला पाहिजे असेल तर पंधरा हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर ग्रामपंचायतिकडून ना हरकत दाखला मिळणार नाही. असे ग्रामपंचायत सरपंच सुरेखा बंडू कदम, ग्रामपंचायत सदस्य सचिन नथुराम कदम व खाजगी इसम बडु दाजी कदम यांनी सांगून लाच मागितली. या प्रकरणी तक्रारदाराने 28 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंद केली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 28जुलै रोजी पडताळणी केल्यावर मौजे रासाठी तालुका पाटण जिल्हा सातारा सुरेखा बंडू कदम व ग्रामपंचायत सदस्य सचिन दोघानी लाच मागितली, मागणीची तडजोड दहा हजार रुपये ठरली आणि दहा हजार रुपये सचिन नथुराम कदम ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वीकारली तसेच आरोपी खाजगी इसम बंडू दाजी कदम यांनी या गुन्ह्याला प्रोत्साहन दिले यावरून तिघांविरुद्ध कोयनानगर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक तसेच श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलीस निरीक्षक श्री.अविनाश जगताप, पो.हवा.भरत शिंदे, संजय साळुंखे, पोना. प्रशांत ताटे, मपोना.श्रद्धा माने, पोकॉ.विशाल खरात, तुषार भोसले, निलेश येवले, चालक पोना.मारुती अडागळे यांनी केली.
कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यासाठी पुढे दिलेल्या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02162/238139 तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा व्हाट्सअप क्रमांक 7875333333 वर संपर्क साधावा. असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.