खटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा राजू मुळीक यांचा इशारा..

खटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा राजू मुळीक यांचा इशारा..

दहिवडी


एफआरपी रक्कम थकवलेल्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस देऊ नका. वर्धन ऍग्रो साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपी प्रमाणे उसाचे पैसे थकवले आहेत. ऊसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यासंदर्भात निवेदने देऊन देखील त्यावर काहीच कार्यवाही केली गेली नाही, फक्त या तारखेला पैसे टाकू, त्या तारखेला टाकू, अशी वेगळी वेगळी उत्तरे मिळत आहेत. जर अशीच उडवा उडविची उत्तरे मिळत राहिली आहेत येत्या 16 सप्टेंबरला तीव्र आंदोलन दहिवडी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यलया समोर करणार आहे. या कारखानदाराने शेतकऱ्यांची बिले मुद्दाम थकवली असल्याने कारखान्याला याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा ही ग्राहक प्रबोधन समिती माण खटावचे अध्यक्ष राजू मुळीक यांनी दिला आहे.


 शेतकरी वर्गावर होणारा हा अन्याय कदापिही खपवून घेतला जाणार नाही, जर कारखाण्याने आपली मनमानी अशीच चालू ठेवली तर आम्हाला आक्रमक पवित्रा घेत कारखान्याला जबरदस्त चपराक द्यावी लागेल असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अनेक वेळा निवेदन देऊन आम्ही कारखान्याला वेळोवेळी सावध करून सुध्दा त्यांनी आम्हला खोटी व उडवा उडवीची उत्तर दिली आहेत आणि लेखी पत्र देखील बिले अदा करण्यासंदर्भात दिली आहेत.  शेतकऱ्यांची बिले ३० ऑगस्ट पर्यंत खात्या वरती जमा करण्याचे आश्वासन दिलेले पाळले नाही. वेळोवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कारखान्याला याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि ज्या अडचणी उभ्या राहतील त्यासाठी वर्धन ऍग्रो साखर कारखाना व प्रशासन जबाबदार राहील. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी सम्राट मौर्य सेना तालुका सचिव एकनाथ वाघमोडे,शंभूराज जाधव, वैभव जाधव, सागर जाधव, मल्हारी चव्हाण, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.