कैलास स्मशानभूमी सातारा यांच्यावतीने विनम्र आवाहन - लाईव्ह (LIVE )अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .

कैलास स्मशानभूमी सातारा यांच्यावतीने विनम्र आवाहन - लाईव्ह (LIVE )अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .

सातारा :- कैलास स्मशानभूमी सातारा यांच्यावतीने विनम्र आवाहन करण्यात आले आहे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लाईव्ह (LIVE )अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .
कोरोना हा संसर्गजन्य आजारांपासून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सातारा प्रशासनाने अंत्यसंस्कार आणि सावडणे विधीस येण्यासाठी वीस लोकांचे मर्यादा घातली आहे . बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे काही अत्यंत जवळच्या लोकांना लाॅकडाऊन च्या काळात अंत्यसंस्काराला पोहचने शकय होत नाही आणि इतर वेळेस सुद्धा पर जिल्ह्यातून आणि राज्यातुन तसेच प्रदेशातून येण्यास आपल्या जवळची व्यक्ती मृत झाल्यास अंत्यसंस्कारासाठी येणे आवश्यक असते पण येऊ शकत नाहीत अशाच लोकांसाठी ( LIVE ) अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . जरी कृपया अशी सुविधा पाहिजे असल्यास 94 22 60 36 25 या नंबर वर दोन तास पुर्वीच संपर्क साधावा अशी विनंती श्री राजेंद्र चोरगे बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली आहे