कोरोना व्हायरसमुळे छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यवसायांना फटका

कोरोना व्हायरसमुळे छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यवसायांना फटका

मुंबई - देशासह संपुर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट आहे. यामुळे अनेक छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यवसायांना याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. तर अनेक ठिकाणी मागणी अभावी व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशाच प्रकारे कायम दुर्लक्षित असणाऱ्या शिल्पकला व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे.

यंदा या व्यवसायिकांना वर्षभर हाताला काम नसल्याचं समोर आलं आहे. या व्यवसायिकांचा वर्षभरातील मोठ मोठे सण, समारंभ यामध्ये गणेशोत्सवात डेकोरेशन तयार करणे, नवरात्री उत्सवात वेगवेगळे सेट तयार करणे, लग्न सोहळ्यात सेट तयार करणे, चित्रपटांचे सेट तयार करणे अशी कामे सुरू असतात. यंदा कोरोनामुळे यातील एकही काम हाताला नसल्याचं समोर आलं आहे. परिणामी लाखो कामगारांवर मागील पाच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेशमंडळांनी घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात आधी विविध ' मंडळात डेकोरेशन करून देणाऱ्या कला दिग्दर्शकांना आणि कामगारांना हाताला काम उरलेलं नाही.