करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांसाठी एक औषध बाजारात आणले आहे

करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांसाठी एक औषध बाजारात आणले आहे

नवी दिल्ली - औषध निर्मिती क्षेत्रात काम करणारी प्रमुख कंपनी ल्युपिन ने बुधवारी करोना व्हायरसची लागण झालेल्या सौम्य आणि कमी गंभीर रुग्णांसाठी एक औषध बाजारात आणले आहे. फेव्हिपिराविर या औषधाला कोव्हिहाल्ड नावाच्या ब्रॅडसह बाजारात आणले आहे. ल्युपिनने आणलेल्या या नव्या औषधाची (new drug india) किमत कमी आहे. या औषधाच्या एका गोळीची किमत ४९ रुपये इतकी आहे. ल्युपिनने शेअर बाजार नियामकांना दिलेल्या माहितीनुसार फेव्हिपिराविर औषध आणिबाणीच्या परिस्थितीत वापरण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी (DCGI)परवानगी दिली. कोव्हिहाल्ड या औषधामध्ये प्रशासनाची सुविधा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून यातील मात्र त्यानुसार निश्चित केली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या औषधाच्या एका स्ट्रिपमध्ये २०० मिलिग्रॅमच्या १० गोळ्या आहेत. प्रत्येक गोळीची किमत ४९ रुपये इतकी आहे. ल्युपिन इंडियाचे अध्यक्ष राजीव सिब्बल यांनी सांगितले की, कंपनीने वेगाने पसरणाऱ्या औषध निर्मितीच्या अनुभवाच्या फायदा घेईल. कंपनीच्या नेटवर्क आणि अन्य यंत्रणेच्या जोरावर कोव्हिहाल्ड भारतातील सर्व ठिकाणी पोहोचवेल. या आधी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजने फेव्हिपिराविरला फ्लूगार्ड नावाच्या ब्रॅडने बाजारत आणले होते. सनने त्यांच्या एका गोळीची किमत ३५ रुपये इतकी ठेवली होती. देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसात देशात रोज ५० हजार नवे करोनाचे रुग्ण आढळत आहेत.