कोरोना व्हॅक्सीनचे तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण

कोरोना व्हॅक्सीनचे तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण

देशात पाच ठिकाणी कोरोना व्हॅक्सीनचे तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण होणार आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी (डीबीटी) च्या सेक्रेटरी रेणु स्वरूप यांनी ही माहिती दिली. देशात ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी, जायडस कॅडिला कंपनी आणि भारत बायोटेकच्या व्हॅक्सीनचे ट्रायल होईल. ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरात लवकर व्हॅक्सीन बाजारात उपलब्ध होईल.

तिसरा टप्पा खूप महत्वाचा आहे. यात रुग्णांवर व्हॅक्सीचा परीणाम कसा होत आहे, याची माहिती मिळेल. इतर रुग्णांना लस देण्यापूर्वी ही माहिती मिळणे गरजेचेआहे. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर आणि अंतिम परवानगी मिळाल्यानंतर व्हॅक्सीनचे प्रोडक्शन सुरू केले जाईल. उत्पादन सुरू झाल्यानंतर भारतात गरजेनुसार पुरवठा केला जाईल.

भारतात व्हॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात डीबीटी सामील आहे. हे देशात व्हॅक्सीन तयार करणाऱ्या सर्व कंपनी आणि संस्थेसोबत काम करत आहेत. डीबीटी यासाठी आर्थिक मदत देणे आणि मंजूरी मिळवून देण्यासोबतच डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कपर्यंत याला पोहचवण्यात मदत करेल. सरकारने 6 इतर ठिकाणही तयार ठेवले आहेत, गरज पडल्यास या ठिकामी ह्यूमन ट्रायल केले जाईल.

ऑक्सफोर्ड आणि याच्या पार्टनरने व्हॅक्सीन तयार करण्यासाठी पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया( सीआयआय) ला निवडले आहे. सीआयआयने ह्यूमन ट्रायलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआई) कडून मंजूरी मिळवली आहे. सीआयआय जगातील सर्वात मोठी व्हॅक्सीन निर्माता कंपनी आहे.