करोनाचे संकट घोंघावत असताना मुंबईकरांवर लेप्टो या आजाराचा प्रसार वाढण्याची शक्यता

करोनाचे संकट घोंघावत असताना मुंबईकरांवर लेप्टो या आजाराचा प्रसार वाढण्याची शक्यता

मुंबई - मुंबईवर करोनाचे संकट घोंघावत असताना आणखी एका आजारानं डोकं वर काढलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं आधीच नुकसान झालेल्या मुंबईकरांवर लेप्टो या आजाराचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालत गेलेल्या नागरिकांना लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं केली आहे. त्यामुळं पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालत गेलेल्या नागरिकांना ७२ तासांत औषधोपचार करण्याचे आवाहन पालिकेनं केलं आहे.

शरीरावर जखमा / खरचटलेला भाग असलेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे.