कॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची नुकताच यशस्वी चाचणी पार पडली

कॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची नुकताच यशस्वी चाचणी पार पडली

दीर्घकाळापासून प्रतीक्षा करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांची स्वतः तयार केलेल्या विमानाच्या व्यवसायिक उड्डाणाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची नुकताच यशस्वी चाचणी पार पडली. स्वतःच्या हिंमतीवर प्रवासी विमानाची निर्मिती करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांना विमानाची चाचणी करण्यासाठी सरकार दरबारी अनेक खेटे मारावे लागले होते. नुकताच त्यांनी धुळे विमानतळावर आपल्या सहा आसनी विमानाची चाचणी केली. विमानाची चाचणी यशस्वी झाली असून, आता नागरी हवाई वाहतूक नियंत्रकाकडून (DGCA) त्याच्या व्यावसायिक उड्डाणाविषयी परवानगीची मागणी करू, असे कॅप्टन यादव यांनी सांगितले.

भारतात अजूनही विमानांची निर्मिती होत नाही. बहुतांश विमान कंपन्या या बोइंग आणि एअरबस या कंपन्यांकडून विमाने खरेदी करतात. त्यामुळे भारताची वाढती लोकसंख्या आणि विमान सेवा क्षेत्रातील वृद्धी पाहता विमान निर्मिती हे मोठं औद्योगिक क्षेत्र ठरू शकेल, असा विश्वास कॅप्टन यादव यांनी व्यक्त केला.