किक चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा निर्माता- दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी नुकतीच केली

किक चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा निर्माता- दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी नुकतीच केली

2014 साली सलमान खान, रणदिप हुड्डा आणि जॅकलीन फर्नांडिस अभिनीत किक या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा निर्माता- दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी नुकतीच केली आहे, त्याचबरोबर चित्रपटात कोण अभिनेत्री झळकणार आहे याची देखील माहिती देण्यात आली आहे. बॉलिवूडचा भाईजान पुन्हा एकदा डेव्हिलच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ‘किक’च्या सिक्वेलमध्ये देखील मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती वर्दा नाडियाडवाला यांनी ट्विट करत दिली आहे. जॅकलिनला तिच्या वाढदिवशी त्यांनी खास गिफ्ट दिले आहे. हे आहे तुझे खास बर्थडे गिफ्ट. तुझ्या कायम लक्षात राहणारे. किक २ चित्रपटाची स्क्रीप्ट साजिद नाडियाडवालाने लिहिली आहे आणि जॅकलिन तुझ्यासाठी चित्रपटात खास भूमिका आहे. सलमान खानच्या किक २ चित्रपटाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.