ऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी भारतातही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला करार

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी भारतातही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने  केला करार

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी ॲस्ट्राजेनेका कंपनीसोबत भारतातही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला आहे. कोविशिल्ड हे नाव या लसीला देण्यात आले आहे. देशात याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी नुकतेच म्हटले होते की प्रती मिनिट ५०० डोस त्यांची कंपनी या लसीचे तयार करेल. त्यांचे म्हणणे होती की सुरूवातीला दर महिन्याला ४० ते ५० लाख लस बनवण्यावर लक्ष दिले जाईल. हे हळू हळू वाढवले जाईल. कंपनीचे वर्षाला ३५ ते ४० कोटी लस बनवण्याचा मानस आहे.

त्याचबरोबर अदार पूनावाला यांनी म्हटले होते की ऑक्सफर्डच्या या लसीची भारतात किंमत खूप कमी असेल. त्यांनी खूप आधी म्हटले होते की भारत आणि बाकी दुनिया यांच्यात ५०-५० टक्क्यांची विभागणी होऊ शकते. सध्या भारतात या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे.