ऐतिहासिक नंतर कॉलेज तरुणीची भूमिका पहिल्यांदाच साकारणार प्राजक्ता गायकवाड

ऐतिहासिक नंतर कॉलेज तरुणीची भूमिका पहिल्यांदाच साकारणार प्राजक्ता गायकवाड

'आई माझी काळुबाई' ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे. आर्याच्या भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आपल्या भेटीला येत आहे. याआधी प्रेक्षकांनी प्राजक्ताला 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईच्या ऐतिहासिक भूमिकेमधून पाहिलं आहे, पण एका कॉलेज मधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच ती करत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूकसुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलला आहे.

प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे. आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. मालिकेत आई काळुबाईच्या भूमिकेत अभिनेत्री अलका कुबल दिसणार आहेत.