एका दमात अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ गाठलं

एका दमात अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ गाठलं

पुणे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वयाच्या 78 व्या वर्षी शिवनेरी किल्ला सर केला. हा गड माझ्यासाठी मोठा नाही. पाऊस असला तरी मी पायीच चढणार, मला हेलिकॉप्टरची गरज नाही. असं म्हणत एका दमात ते ही अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ गाठलं. जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आरती ही केली. राज्यपालांच्या सोबतीला स्थानिक आमदार अतुल बेनके उपस्थित होते. राज्यपालांच्या या धाडसाचे भाजप खासदार संभाजीराजे यांनी देखील कौतुक केलं आहे.

महाराजांचे विचार अंमलात आणणारा खरा शिवभक्त असल्याचं राज्यपाल बेनके यांना म्हणाले. ते केवळ महाराज नव्हे तर एक अवतार होते. असे अवतार जिथं जन्म घेतात ती भूमी पवित्र असते. म्हणून याठिकाणी येण्याचं मी ठरवलेलं होतं. असं बेनके यांच्याकडे मनमोकळेपणाने बोलले.