एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझीकोडमध्ये कोसळलं

केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 121 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रनवेहून पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.