इक्वेडोरची कोरोनामुळे शहरातील शिक्षणापासून वंचित मुलांसाठी १६ वर्षीय विद्यार्थिनीची झाडाखाली शाळा, ४० मुलांना लाभ

इक्वेडोरची कोरोनामुळे शहरातील शिक्षणापासून वंचित मुलांसाठी १६ वर्षीय विद्यार्थिनीची झाडाखाली शाळा, ४० मुलांना लाभ

इक्वेडोरची १६ वर्षीय हायस्कूलची विद्यार्थिनी डेनिसी तोआला सध्या चर्चेत आहे. कारण आहे तिने सुरू केलेली शाळा. तिच्या शाळेत ४० मुले दररोज शिक्षण घेतात. जगभरातील इतर देशांप्रमाणेच लॉकडाऊनमुळे इक्वेडोरमधील शाळाही बंद होत्या. परंतु नंतर आॅनलाइन अध्ययनाला सुरुवात झाली. गुआक्विलच्या परिसरातील भागात राहणाºया शेकडो मुलांकडे मोबाइल व इंटरनेटची सुविधाही नाही. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. या समस्येविषयी माहिती मिळताच तिच्या मनात या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा विचार आला. त्यानुसार तिने निर्णय घेतला आणि घराजवळील एका झाडाखाली शाळा सुरू केली. मुलांना देण्यात आलेले होमवर्क डेनिसी शाळेच्या संकेतस्थळावर पाहते. त्यानंतर वर्गात मुलांना तेच शिकवते. संपूर्ण खर्चही डेनिसीच उचलते. गुआक्विल भागात कोरोनाचा मोठा संसर्ग आहे. अशा परिस्थितीत डेनिसीने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.