आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स जिओ यांच्यामध्ये चर्चा सुरु

आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स जिओ यांच्यामध्ये चर्चा सुरु

यावर्षी युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी चीनच्या विवो या कंपनीने स्पॉन्सरशिप काढून घेतली आहे. आयपीएल तोंडावर आलेली असताना चीनच्या कंपनीने बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे. पण आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स जिओ यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. पण यावेळी आयपीएललाल स्पॉन्सरशिप देण्यासाठी जिओपुढे एक मोठी समस्या असल्याचे आता पुढे आली आहे.

आता आयपीएल तोंडवर आल्यावर विवोने आपण या वर्षी तरी आयपीएलला प्रायोजकत्व देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधी प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे. पण यावेळी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची जिओ ही कंपनी पुढे आल्याचे समजते आहे. पण जिओने जर आयपीएलची स्पॉन्सरशिप घेण्याची ठरवली तर त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहीला आहे.

 

बीसीसीआच्या काही नियमांमध्ये जिओ ही कंपनी अडकू शकते, असे म्हटले जात आहे. रिलायन्स जिओ ही कंपनी मुकेश अंबानी यांची आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता यांचा मालकीचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे परस्पर हितसंबंध यामुळे जपले जाणार की नाही, हे तपासून पाहावे लागणार आहे. जर परस्पर हितसंबंध जपले जात असतील तर जिओला आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवता येऊ शकणार नाही.