आपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे महागात पडू शकते

आपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे महागात पडू शकते

अनेकदा आपण जिममध्ये आपल्या क्षमतेपेक्षा अधिक उचलण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. केवळ जिमच नाहीतर इतर ठिकाणीही आपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे अनेकदा महागात पडू शकते. असेच काहीसे रशियन वेटलिफ्टर अ‍ॅलेक्झँडर सेडीखसोबत घडले आहे. अ‍ॅलेक्झँडरने 400 किलो वजनासह स्क्वॉड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो अयशस्वी ठरला. याच परिणाम असा झाला की, त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

अ‍ॅलेक्झँडर रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित द वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग फेडरेशन यूरोपियन चॅम्पियनमध्ये भाग घेण्यासाठी पोहचला होता. जेथे तो स्पर्धे दरम्यान 400 किलो वजनासह स्क्वॉड करत होतो. मात्र स्क्वॉड करताना अचानक त्याचा तोल जातो व तो खाली पडला.