आईनेच आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली

आईनेच आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली

मुंबईला जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनेच आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील हबीबनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी महिलेला बाळाला विकण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली. तक्रार मिळाल्यानंतर २४ तासाच पोलिसांनी कारवाई करत नवजात बाळाचा ताबा मिळवला आणि महिलेलाही अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “२२ वर्षीय शेख झोया खान पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एकटीच राहत होती. तिला मुंबईला जाण्याची इच्छा होती. तसंच बाळाची एकटी काळजी घेताना तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. यावेळी तिने आपल्या बाळाला विकण्याचा निर्णय घेतला. शेख अदनाना असं या बाळाचं नाव आहे”.