अमेरिकेकडून भारताला एमएच ६०-आर हेलिकॉप्टर देण्यात येणार

अमेरिकेकडून भारताला एमएच ६०-आर हेलिकॉप्टर देण्यात येणार

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) - भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू असताना अमेरिकाही चीनच्या हालचालींवरही नजर ठेवून आहे. चीनविरोधात अमेरिकेने भारताला सहकार्य करण्याचे जाहीर केल्यानंतर चीनने थयथयाट केला. हिंदी महासागरात चीनच्या पाणबुडींचा सामना करण्यासाठी अमेरिकेकडून भारताला एमएच ६०-आर हेलिकॉप्टर देण्यात येणार आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ होणार आहे.

भारत-अमेरिकेत या हेलिकॉप्टरबाबत फेब्रुवारी महिन्यात करार करण्यात आला होता. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता भारतासाठी हा करार अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात हे हेलिकॉप्टर पुढील वर्षाच्या सुरुवातीला दाखल होण्याची दाट शक्यता आहे. एमएच ६०-आर हेलिकॉप्टर बनवणा-या कंपनीचे अधिकारी विलियम ब्लेअर यांनी सांगितले की, फेब्रुवारीत हा करार करण्यात आला होता. त्यानंतर आता हे हेलिकॉप्टर विक्रमी वेळेत भारताला सुपूर्द करण्यात येणार आहे. कंपनीला एमएच ६०-आर हेलिकॉप्टर नौदलाच्यादृष्टीने खास आहे. अ‍ॅण्टी सबमरीन रडठअफ हेलिकॉप्टरमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. भारताला अत्याधुनिक इंजिन, खास मिसाइल आणि एमके-५४ टॉरपीडोची आवश्यकता होती. हेलिकॉप्टर अतिशय खास आहे. कॉकपिटमध्ये बसलेल्या पायलट्स रात्रीच्या अंधारात आपल्या लक्ष्याला पाहू शकतात. त्याशिवाय चार ते पाच केबिन क्रूसह पाच प्रवासीही बसू शकतात.

हेलिकॉप्टरच्या केबिनची लांबी ३.२ मीटर आणि रुंदी १.८ मीटर आहे. एमएच ६० हेलिकॉप्टरमध्ये अनेक खास शस्त्रे राहू शकतात. एजीएस-११४ हेलफायर अ‍ॅण्टी-सरफेस क्षेपणास्त्रे लावण्यात येऊ शकतात. त्याशिवाय पाणबुडींना लक्ष्य करण्यासाठी पाणबुडीविरोधी एकेटी ५० किंवा एमके ४६ अ‍ॅक्टीव्ह/पॅसिव्ह टॉरपिडो लाँच करता येऊ शकते. त्याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये ७.६२ एमएमची मशीनगनही लावता येऊ शकते.