अ‍ॅमेझॉनवर खास सेल : टीव्ही, लॅपटॉपवर जबरदस्त सूट

अ‍ॅमेझॉनवर खास सेल : टीव्ही, लॅपटॉपवर जबरदस्त सूट

नवी दिल्ली - गेम खेळण्याची आवड असणाºया युजर्ससाठी अ‍ॅमेझॉनवर एक खास सेल आयोजित करण्यात आला आहे. Amazon Grand Gaming Days सेल आज रात्री १२ वाजेपासून लाइव्ह होणार आहे. २१ जुलैपासून सुरू होणारा हा सेल २३ जुलैच्या रात्री १२ पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये गेमिंग संबंधित सर्व प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काउंट आणि डिल्स याचा समावेश आहे. या सेलमध्ये लॅपटॉप, मॉनिटर, अडवॉन्स हेडफोन, गेमिंग कन्सोल, ग्राफीक कार्ड्स यासारखे प्रोडक्टवर डिस्काउंट मिळणार आहेत. तसेच Lenovo, Acer, ASUS, LG, HP आणि Sony यासारख्या ब्रँड्सच्या स्मार्ट  वर सुद्धा डिस्काउंट आॅफर केले जात आहे.

मोठ्या डिस्प्ले टीव्हीवर ४० टक्के डिस्काउंट
या सेलमध्ये मोठी स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आॅफर केले जाणार आहे. तसेच याशिवाय, ८ हजार रुपयांच्या कमीत कमी खरेदीवर १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.

सॅमसंग सीरीज ५ फुल HD LED स्मार्ट TV
४९ इंचाच्या मोठ्या डिस्प्लेचा टीव्ही  या सेलमध्ये ५३ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जावू शकतो. या टीव्हीत युजरला मोठा डिस्प्ले सोबत डॉल्बी डिजिटल प्लस साउंड आणि मल्टी आउटपूट आॅडियो मिळतो.

स्वस्त मिळणार लेनोवाचा गेमिंग लॅपटॉप
Lenovo Legion 540 गेमिंग लॅपटॉपवर सुद्धा या सेलमध्ये डिस्काउंट दिला जाणार आहे. या लॅपटॉपमध्ये 9TH जनरेशन कोर i7  प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX 1650 4 GB देण्यात आले आहे. या सेलमध्ये हा लॅपटॉप केवळ ७८ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो.

Acer च्या गेमिंग लॅपटॉपवर डिस्काउंट
Acer Nitro 7 9th Gen Core i7 लॅपटॉप या सेलमध्ये डिस्काउंटवर खरेदी करता येवू शकतो. हा लॅपटॉप Nvidia GeForce GTX 1660Ti 4GB ग्रॅफिक कार्डसोबत येतो. या लॅपटॉपला या सेलमध्ये ९४ हजार ९९० रुपयात खरेदी केले जावू शकते.

१० हजार रुपये कमी किंमतीत एलजीचा गेमिंग मॉनिटर
या सेलमध्ये LG चा २४ इंचाचा गेमिंग मॉनिटर ९,७२२ रुपयांत खरेदी केला जावू शकतो. या मॉनिटरचा स्क्रीन रिफ्रेश रेट 75Hz आहे. हे मॉनिटर डायनामिक अ‍ॅक्शन सिंक, ब्लॅक स्टेबलाइजर अँड गेम मोडसोबत येतो.

सुनंदा घाडगे - प्रतिनिधी